Nashik Municipal Corporation Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका सज्ज

आपत्कालीन परिस्थितीसाठी 117.5 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा बफर स्टॉक,हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारे ऑक्सिजन प्लँटही कार्यान्वित

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक - कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) सज्ज झाली आहे. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात (Hospital) तब्बल 117.5 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा (Oxygen) बफर स्टॉक करण्यात आला आहे. मागील वर्षी याचं रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र आता ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी नाशिक महापालिकेकडून पालिका रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरच्या (Covid Care Centre) आवारात हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्लँट बसवण्यात आले आहे. (Nashik Municipal Corporation is ready for the third wave of corona)

हे देखील पहा -

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात 117.5 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या साठा करण्यात करण्यात आला आहे. त्यासाठी 30 किलो लिटरच्या 2, 20 किलो लिटरच्या 2 आणि 3 किलो लिटरची 1 असे 5 मोठे टॅंक उभारण्यात आलेत. सोबतचं 3 हजार ऑक्सिजन सिलेंडर आणि ड्युरा सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही नाशिकमध्ये (Nashik) ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुख आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

SCROLL FOR NEXT