पोटच्या गोळ्यासाठी आईनं लावली जीवाची बाजी; बिबट्याच्या जबड्यातून वाचवले प्राण अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

पोटच्या गोळ्यासाठी आईनं लावली जीवाची बाजी; बिबट्याच्या जबड्यातून वाचवले प्राण

7 वर्षांचा कार्तिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. केवळ आईने दाखवलेल्या धाडसामुळे त्याचे प्राण वाचलेत.

अभिजीत सोनावणे

नाशिक -  स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी अशी म्हण आपल्याकडे म्हटली जाते, याचाचं प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आपल्या पोटच्या गोळ्यासाठी नाशिकच्या ईगतपुरी तालुक्यातील फोडशेवादीमध्ये एका आईनं चक्क बिबट्यावर झेप घेत बिबट्याच्या जबड्यातून आपल्या मुलाला वाचवल आहे. 7 वर्षांचा कार्तिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. केवळ आईने दाखवलेल्या धाडसामुळे त्याचे प्राण वाचलेत.

हे देखील पहा -

बुधवारी संध्याकाळी आपल्या घराच्या अंगणात खेळत असतांना बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने कार्तिकवर हल्ला केला.आपल्या जबड्यात पकडून बिबट्या कार्तिकला फरफटत नेऊ लागला. त्याचवेळी घराच्या अंगणात दुसऱ्या बाजूला काम करत असलेल्या सीताबाईंनी हा प्रकार पाहिला. आणि क्षणाचाही विलंब न लावता या मातेनं बिबट्याकडे झेप घेत त्याच्या जबड्यातून आपल्या मुलाला ओढल्याने त्याचा जीव वाचला. 

कार्तिकचे प्राण या धाडसी मातेनं वाचवले. मात्र बिबट्यानं त्याची मान जबड्यात पकडल्यानं त्याच्या मानेला गंभीर जखमा झालेल्या असल्यानं सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात कार्तिकवर उपचार सुरु आहेत. मात्र एक आई आपल्या पोटच्या गोळ्यासाठी जे धाडस करू शकते, ते या जगात दुसरं कुणीही करू शकत नाही, याचा प्रत्यय सीता बाईच्या रूपाने येतो. तर या परिसरात बिबट्यानं याआधी एका लहान मुलावर हल्ला करून त्याला ठार केलं आहे.  त्यामुळे या भागातल्या नरभक्षी बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

SCROLL FOR NEXT