MNs Nashik News Saamtv
महाराष्ट्र

Nashik MNS News: मनसेच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार! राज ठाकरेंना पत्र पाठवत नाशिक शहराध्यक्षांचा राजीनामा

Dilip Datir Resignation Letter Sent to Raj Thackeray: नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेमध्ये 2012 मध्ये सत्ता मिळवली होती.

Gangappa Pujari

Nashik News: अजित पवारांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांनी राज्याचे राजकारण तापलेले असतानाच नाशिकमध्ये (Nashik) मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आपल्याला पद मुक्त करावे अशी विनंती करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर (Dilip Datir) यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या संबंधीचे पत्र त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे. पदाला न्याय देता येत नसल्याने हा राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेमध्ये 2012 मध्ये सत्ता मिळवली होती. त्यानंतर पक्षाची अवस्था बिकट असली तरी गटबाजी मात्र थांबलेली नाही. आता थेट शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दिलीप दातीर हे शिवसेनेचे (Shivsena) नगरसेवक असताना त्यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये मनसेच्या माध्यमातून पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान त्यानंतर त्यांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शहराध्यक्षपदी नियुक्त केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT