Nashik Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik Crime News: कॅफेचं भाडं १०० -२०० रुपये तास, तरूण-तरुणींचे अश्लील चाळे; महिला आमदारानं टाकली धाड; पाहा VIDEO

BJP MLA Devyani Pherande action: नाशिकमध्ये 'अ'मोगली कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकत कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी कारवाई केली आहे.

Bhagyashree Kamble

नाशिकमधील कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या ठिकाणी तरूण आणि तरूणींना १०० ते २०० रूपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कॅफेमध्ये तरूण तरूणी अश्लील चाळे करत होते. फरांदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकत रंगेहाथ पकडलं. कारवाई केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे.

कॅफेवर कारवाई केल्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'कॅफे सुरू होता, भाड्यानं तासांसाठी रूम दिले जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर मी धाड टाकली. हे भयंकर प्रकार गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते. नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम सुरू आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

'कॉलेजला न जाता तरूणवर्ग कॅफेला येतात. व्यक्तिगत जीवानावर आम्ही जात नाही. पण ड्रग्जबाबत मी खपवून घेणार नाही. इंदिरानगर भागातील तक्रारी येत आहे. मी कटाक्षाने लक्ष घालत आहे. माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी धाड टाकली आहे. स्थानिक पोलिसांना पोहचायला उशीर झाला आहे. मुलं खरच कॉलेजला जातात की नाही हे पालकांनी बघावे '. असंही फरांदे म्हणाले आहेत.

कॅफेच्या अडून गैरवापर केला जात आहे. यात मुलींची फसवणूक होऊ शकते. इंदिरानगरला सुद्धा असेच सुरू होते, याची दखल घेत यावर कारवाई झालेली आहे', असंही आमदार फरांदे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT