NASHIK BIRD ELECTION 2026 saam tv
महाराष्ट्र

कावळा अन् गिधाडात निवडणूक झाली, नाशिकचा मानचिन्ह म्हणून दणदणीत विजय कोणाचा?

Nashik bird election: नाशिकच्या मानचिन्ह पक्षी निवडीसाठी झालेल्या अनोख्या निवडणुकीत गिधाडाने कावळ्याचा 958 मतांनी पराभव केला. गिधाडाला 1,995, तर कावळ्याला 1,037 मते मिळाली. जाणून घ्या संपूर्ण निकाल.

Omkar Sonawane, अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

आतापर्यंत सहकारी संस्था, बँका, शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, नाशिकमध्ये चक्क पक्ष्यांचीच निवडणुक पार पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत पक्ष नव्हे, तर कावळा विरुद्ध गिधाड अशी थेट लढत रंगली. नाशिकचा मानचिन्ह पक्षी कोण असावा, यासाठी घेण्यात आलेल्या अनोख्या निवडणुकीत गिधाडाने बाजी मारली आहे. कावळा आणि गिधाड यांच्यात झालेल्या या निवडणुकीत गिधाडाने तब्बल 958 मतांच्या फरकाने कावळ्याचा दारुण पराभव केलाय. एकूण 3 हजार 32 मतांपैकी गिधाडाला 1 हजार 995 मत मिळाली, तर कावळ्याला 1 हजार 37 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता गिधाडाला मानचिन्ह पक्षी म्हणून बहुमान मिळालाय.

नाशिक महापालिकेत नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते आज हा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी विविध पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, वन्यजीव अभ्यासक आणि पक्षी संवर्धनासाठी काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते. पक्ष्याशिवाय जनजागृती निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. मात्र, गिधाडाची निवड झाली असली तरी नाशिकच्या अधिवासात राहणाऱ्या इतर पक्ष्यांचाही विचार व्हायला हवा होता, अशी भूमिका काही पर्यावरणप्रेमींनी मांडली आहे. गिधाडाच्या निवडीला विरोध नसला तरी नाशिकच्या जैवविविधतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अन्य पक्ष्यांनाही या प्रक्रियेत स्थान मिळायला हवं होतं, असं पर्यावरणप्रेमी अमित कुलकर्णी यांनी म्हटलंय.

दरम्यान, मानचिन्ह पक्ष्याची निवड झाली म्हणजे उपक्रम संपला असं नाही, तर आता प्रत्यक्ष पक्षी संवर्धनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. गिधाड आणि कावळा या दोन्ही पक्ष्यांचं पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचं संरक्षण, देशी वृक्षांचं संवर्धन, सुरक्षित अन्नसाखळी आणि शास्त्रीय कचरा व्यवस्थापन यावर भर देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पैशांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; २१ वर्षीय महिलेने संपवले जीवन, पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update: नागपुरात ठाकरे गट आक्रमक; बाळासाहेबांच्या फोटोच्या कथित विटंबनेविरोधात निषेध आंदोलन

BJP MLA : भाजप आमदाराला ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

महिलांसाठी स्वस्तात मस्त 2 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, लेटेस्ट 5 डिझाईन्स

PUC Rules : वाहनधारकांसाठी मोठी बातमी! PUC नियमांत मोठा बदल; जुन्या आणि नव्या वाहनांसाठी काय असणार नवी तरतूद

SCROLL FOR NEXT