Nylon Manja Saam tv
महाराष्ट्र

Manmad News : नायलॉन मांज्यामुळे सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी; बंदी असतांनाही सर्रास वापर

Nashik News : संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मांजा वापर व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) :नाशिक शहर व जिल्ह्यात  नायलॉन मांजा वापर व विक्रीवर बंदीचे आदेश पोलीस प्रशासनाने (Manmad) काढले आहेत. असे असताना त्याचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. येवला तालूक्यात नायलॉन मांज्यामुळे एक सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Live marathi News)

मल्हार नितीन राऊत असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. मल्हार हा चांदगाव येथून आजोबांसोबत दुचाकीवरुन येत होता. या दरम्यान कटलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकल्याने गळ्यापासून तोंडापर्यंत त्याला खोल जखम झाली आहे. (Nashik)  त्याला तातडीने येवला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. जखम मोठी असल्याने चाळीस टाके घालण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरीही मांजाचा वापर 

मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. या पार्श्वभूमीवर (Police) पोलीस प्रशासनाकडून मांजा वापर व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत. असे असताना देखील विक्री होत असून त्याचा वापर देखील होत असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT