Cold Wave Saam tv
महाराष्ट्र

Cold Wave : शेकोटी करून द्राक्षबाग वाचवण्याचा प्रयत्न; वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

Nashik News : उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र देखील गारठला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात थंडीचे प्रमाण अधिक असते.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुक्याचे तापमान दिवसेंदिवस (Nashik) कमी होत आहे. या वाढत्या थंडीचा परिणाम द्राक्ष बागांवर होताना दिसून येत आहे. यामुळे शेतकरी (Farmer) संकटात सापडला असून द्राक्ष बाग वाचविण्यासाठी शेकोटी करत आहेत. (Tajya Batmya)

उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिकडून येणाऱ्या (Cold Wave) थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र देखील गारठला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात थंडीचे प्रमाण अधिक असते. यात थंड वाऱ्यांमुळे पारा आणखीनच खाली घसरला आहे. आज (Manmad) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात ४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची या थंडीच्या हंगामातील निच्चांकी नोंद झाली. याचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतं आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकरी थंडीत थांबताय बागेत 

द्राक्ष बाग (Grapes Farming) वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी द्राक्ष बागेत धूर व शेकोटी करून द्राक्षबाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्षांना तडे तसेच द्राक्ष फुगवणीवर याचा परिणाम होत असतो. यामुळे द्राक्ष बागांना ऊब निर्माण करण्याकरता द्राक्ष उत्पादक शेतकरी रात्रीच्या वेळी आपल्या द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: चांदिवली विधानसभेत शिंदे गटाला धक्का; नसीम खान आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT