Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident: बस- ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू, प्रवाशी जखमी

Manmad News : नाशिकच्या चोंडी घाटाजवळ बस व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्यावर सर्वत्र कांदा फेकला गेला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मनमाड- मालेगाव महामार्गावर मनमाडहून नंदूरबारकडे जात (Manmad) असलेली एसटी बस व कांद्याने भरलेल्या ट्रॅकरचा अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. 

नाशिकच्या चोंडी घाटाजवळ बस व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्यावर सर्वत्र कांदा (Onion) फेकला गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचत त्यांनी अधिक तपास सुरु केला आहे. सकाळच्या सुमारास मनमाडला कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर जात असताना हा अपघात झाला. 

ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू 

अपघात होऊन जोरदार धडक बसल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक हा कानडगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर बस चालक- वाहकासह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT