तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील एका नामांकीत आयटी कंपनीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय..आयटी क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न घेऊन येणाऱ्या तरुणाला धर्मांतराच्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. आयटी कंपनीत हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरून तरुणाचे ब्रेनवॉशिंग केलं जात होतं... तसचं पीडित तरुणाला कामाच्या वेळेत दुपारी नमाज पठण करण्यासाठीही भाग पाडल्याचाही आरोप आहे... याशिवाय हिंदू तरुणाला नॉनव्हेज खाऊ घालून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न आयटी कंपनीतील आरोपींकडून केला जात होता... तसचं पीडित तरुणाला विशिष्ट पोषाख घालून धार्मिक चालिरितींसाठी दबाव टाकल्याचाही प्रकार समोर आलाय..
महत्वाचं म्हणजे यात आयटी कंपनीतील कर्मचारीच सहभागी होते.आयटी कंपनीतील तैसिफ अत्तार, दानिश, शाहरुख शेख हे धर्मांतराचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे...ही घटना सामोरी आल्यानंतर एकच खळबळ उडालीय. त्यामुळे आता लव्ह जिहादनंतर कॉर्पोरेट जिहाद फोफावू लागलाय, असं विधान नितेश राणेंनी केलयं...
दुसरीकडे हे प्रकरण फक्त धर्मांतरापुरते मर्यादित नाही.तर याच कंपनीतील 8 तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचा प्रकारही समोर आला आहे, यासंर्दभात कंपनीतील कर्मचाऱ्यांविरोधात लैगिक शोषणासंदर्भातील 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत... दरम्यान या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात आलीय..
आयटी क्षेत्रातील झगमगाटामागे लपलेलं हे भयाण वास्तव अंगावर काटा आणणारा आहे. मात्र आता करिअरच्या नावाखाली तरुणांच्या धार्मिक भावनांशी खेळणाऱ्यांचा हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरु होता? यात अजून कोणाचा हात आहे? धर्मांतराच्या रॅकेटसह महिलांचं शोषण करणारे नाशिकचे आयटी क्षेत्रातील उच्चभू खरात नेमके कोण आहेत? याचा शोध पोलीस यंत्रणेपुढचं मोठं आव्हानं असणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.