nashik honey trap case Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Honey Trap Case : हनी ट्रॅपमध्ये अडकलेले ते ४ मंत्री , १५ आमदार कोण?

Maharashtra Honey Trap Case update : हनी ट्रॅप प्रकरणात ४ मंत्री , १५ आमदार अडकल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्री आणि बडे अधिकारी हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याच प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याकडून ३ कोटी उकळल्याचंही प्रकरण ताजं आहे. या हनी ट्रॅप प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ट्रॅपमध्ये ४ मंत्री आणि १५ आमदार अडकल्याची दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचा विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनात पेन ड्राईव्ह बॉम्ब पाहायला मिळाला. हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं. या हनी ट्रॅपमध्ये मुंबईतील मंत्रालय, ठाणे, नाशिक ही शहरे केंद्रबिंदू असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केला. नाना पटोले यांच्या आरोपांवर अधिवेशनात अंतिम प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनीही भाष्य केलं.

नाना पटोले यांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळले. नाना पटोले यांचा पेनड्राईव्ह गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलाच नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. दुसरीकडे नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात राज्यभरातील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी देखील अडकल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात संजय राऊत यांनीही गंभीर आरोप केला. संजय राऊत यांनी ४ मंत्री आणि १५ आमदार अडकल्याचा दावा केला. तसेच शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार याच ट्रॅपमुळे पळाल्याचाही दावा केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून विधानभवनात दिशाभूल केली जात आहे. मंत्री गिरीश महाजन आणि प्रकाश लोढाचा एकत्र फोटो शेअर करत सीबीआय चौकशीची मागणी राऊतांनी केली.

तसेच या ट्रॅपचे सूत्र जामनेर, मुंबई, नाशिक आणि दिल्लीतून हलल्याचा दावा राऊतांनी केला. संजय राऊत यांच्या दाव्यामुळे अडकलेले नेते मंडळी कोण आहेत, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील अडकलेले ४ मंत्री आणि १५ आमदार कोण, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या लोक प्रतिनिधींची नावे देखील समोर आलेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT