nashik  Saam tv
महाराष्ट्र

Nashik Flood : नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा कहर! गोदावरी नदीला पूर; रस्ते जलमय, वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरलं

Nashik Flood update : नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत.

Vishal Gangurde

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याची माहिती मिळत आहे. गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आहे. या गोदावरी नदीच्या पुरात कार बुडाल्याची घटना घडली आहे. नाशकात रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.

नाशिकला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसामुळे मान्सून पूर्व कामाजा फज्जा उडाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, गुडघाभर पाण्यातून वाहचालकांना वाट काढावी लागत आहे. धुव्वाधार पावसाने नाशिक शहराला झोडपलं आहे. नाशिकमधील गडकरी चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नाशिकच्या दारणा धरणातून पाणी सोडलं आहे. नाशिकमध्ये दारणा धरणातून दुपारी तीन वाजेपासून दारणा धरणातून ११०० क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ धाली आहे. मुसळधार पावसामुळे दारणा धरण ५० टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, नांदूर मधमेश्वर धरणातूनही पाण्याचा विसर्गाला सुरुवात झाली आहे. नांदूर मधमेश्वर धरणातूनही ३२२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते जलमय झाली आहे. त्र्यंबकेश्वर गावातील कुशावर्त, निवृत्तीनाथ महाराज मंदिर,बाळलेश्वर चौक या भागातील रस्त्यांवर पुराचं पाणी साचलं आहे. तर अनेक घर आणि वाड्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने नुकसान झालं आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : पर्यटकांना खुणावतोय कर्जतजवळील 'हा' धबधबा, पाहता क्षणी निसर्ग सौंदर्यात हरवून जाल

ED: ईडीची मोठी कारवाई: मुंबईत बेकायदेशीर डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात ३.३ कोटींची रोकड जप्त|VIDEO

Jio-Airtel-Vi युझर्स ऐकलं का! रिचार्ज प्लॅन महागणार, टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना देणार धक्का

Sugar Free Barfi Recipe : मधुमेही रुग्णांसाठी शुगर फ्री बर्फी, आताच नोट करा रेसिपी

Maharashtra Politics: पुण्यात काँग्रेसला खिंडार! थोपटे, धंगेकरांनंतर आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ, भाजपचे कमळ घेणार हाती

SCROLL FOR NEXT