Rescue teams and locals at the site after a house slab collapsed in Malegaon due to heavy rainfall in Nashik district. saam tv
महाराष्ट्र

पावसाचा हाहाकार! घराचा स्लॅब कोसळून आजी-नातवाचा मृत्यू

Nashik Heavy Rain House Collapse Incident Details: नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना; मालेगावमध्ये घराचा स्लॅब कोसळून आजी-नातवाचा मृत्यू, तर निफाडमध्ये शाळेवर झाड कोसळल्याने भीतीचे वातावरण.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

सध्या राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडत आहे. नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावमध्ये घराचा स्लॅब कोसळून आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर निफाड तालुक्यात शाळेवर झाड कोसळण्याची घटना घडली. मालेगाव शहरातील कलेक्टर पट्टा परिसरात महारुद्र हनुमान मंदिराजवळ ही दुर्दैवी घटना घडली. सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घराचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत विमलबाई पंढरीनाथ येवले (वय 80) आणि चेतन रामचंद्र येवले (वय20) यांचा जागीच मृत्यू झाला.

घटना दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास घडली. घरात एकूण पाच जण राहत होते. घटनेची महाइति मिळताच अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि परिसरातील नागरिकांना तातडीने मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र आजी आणि नातवाला वाचवता आले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगावजवळ ब्राह्मणगाव (विंचूर) येथे आणखी एक धक्कादायक घटना घडली. जिल्हा परिषद मराठी शाळेवर वादळी वाऱ्यामुळे मोठे लिंबाचे झाड कोसळले. झाड दोन भागांत तुटून त्यातील एक भाग थेट शाळेच्या इमारतीवर पडला, ज्यामुळे छतावरील पत्र्यांचे नुकसान झाले.

झाड कोसळताना झालेल्या मोठ्या आवाजामुळे शाळेतील शिक्षक आणि 31 विद्यार्थी घाबरून तातडीने वर्गाबाहेर धावले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, झाडाचा उर्वरित भाग अजूनही धोकादायक अवस्थेत उभा असून तो तातडीने हटविण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक दिलीप फापाळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 गोष्टी

Maharashtra News Live Update: पंचायतराज समितीकडून अकोला जिल्हा परिषदेची झाडाझडती

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

Walking benefits : दररोज १०,००० पावलं चाला, ३० दिवसांत शरीरात हे बदल होतील?

Dates Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा २ खजूर; शरीराला मिळतील 'हे' ७ जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT