Nashik Grape Theft Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: चोरट्यांचा द्राक्ष बागेकडे मोर्चा, 70 ते 80 क्विंटल द्राक्षांची चोरी; नेमके घडलं काय?

Nashik Grape Theft : घराचे कुलूप तोडून आणि बंगलाफोडून चोरीच्या अनेक घटना आजपर्यंत आपण ऐकल्या आहेत. पण नाशिकच्या निफाड तालुक्यात चक्क द्राक्षच चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Saam Tv

अजय सोनवणे,साम टीव्ही

नाशिक: निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे चोरट्यांनी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळवत तब्बल 70 ते 80 क्विंटल द्राक्षांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे शेतकरी राहुल वामनराव भोसले आणि जितेंद्र अशोकराव भोसले यांना सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

सध्या द्राक्ष बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू असताना, अनेक ठिकाणी द्राक्ष माल घेऊन पैसे न देता पलायन करण्याच्या घटनाही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत आता सरळ बागेतूनच मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची चोरी होण्याच्या प्रकारांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, त्यांनी पोलिसांनी त्वरित तपास करून चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. द्राक्ष उद्योग हा अनेक शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या चोऱ्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जुन्या घराची भिंत कोसळली, तिघे गंभीर जखमी

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT