Nashik Accident SaamTV
महाराष्ट्र

आई...लग्नाला जाताना ज्यूस पिण्यासाठी थांबले, भरधाव कारची जोरदार धडक, शिक्षिकेचा जागीच मत्यू; लेकरांचा हंबरडा

Nashik Accident : ठाकूर यांच्या पश्चात दोन मुली व पती असा परिवार आहे. ठाकूर यांची मुलगी इयत्ता सहावीत शिकत आहे तर दुसरी मुलगी दुसऱ्या वर्गात शिकत आहे. तर त्यांचे पती एलआयसी या ठिकाणी नोकरी करतात.

Prashant Patil

नाशिक : नाशकातील गोविंद नगर सदाशिव नगर जॉगिंग ट्रॅकलगत सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एक शिक्षक महिला ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. गायत्री संदीप ठाकूर आणि मिलन जाचक या दोघी शिक्षिका गंगापूर रोड येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह सोहळा घराकडे येत असताना जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या एका ज्यूसच्या स्टॉलवर ज्यूस पिण्यासाठी थांबले. मात्र समोरून भरधाव वेगाने असलेल्या काळ्या रंगाच्या कारने त्यांना चिरडले. यामध्ये गायत्री ठाकूर जखमी झाल्या, त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ठाकूर यांच्या पश्चात दोन मुली व पती असा परिवार आहे. ठाकूर यांची मुलगी इयत्ता सहावीत शिकत आहे तर दुसरी मुलगी दुसऱ्या वर्गात शिकत आहे. तर त्यांचे पती एलआयसी या ठिकाणी नोकरी करतात. मृत ठाकूर या त्रिमूर्ती चौकातील उंटवाडी परिसरात असलेल्या माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. इंदिरानगर परिसरातील रहिवासी असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार पलटी

महामार्गावर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना कार थेट रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना राहाता तालुक्यातील नांदूर शिवारात घडली आहे. या अपघातात गाडीत बसलेले पाच तरुण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी तरुणांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन जण गंभीर जखमी आहेत.

बाभळेश्वर- श्रीरामपूर महामार्गावर नांदूर परिसरात एका दुचाकीस्वाराला वाचवताना गाडी खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या अपघातात जखमी पाचही तरुण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी असल्याचे समजते. तर दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे. या अपघातात पाच तरुण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघे गंभीर जखमी असल्याने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT