Ghodhni Nagar Panchayat Election Turmoil Saam
महाराष्ट्र

'तुम्ही भाजपला विकल्या गेले..' अधिकाऱ्याचा मतदान केंद्रावर सावळा गोंधळ; काँग्रेस नेत्या संतापल्या, नेमकं घडलं काय?

Ghodhni Nagar Panchayat Election Turmoil: मतदान केंद्राच्या आत पुरवणी मतदार यादी उपलब्ध नसल्याने तब्बल 150 मतदारांना मतदान नाकारण्यात आले, यामुळे वाद पेटला.

Bhagyashree Kamble

राज्यात २ तारखेला सर्वत्र नगरपंचायत आणि नगरपरिषदेची मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक प्रभागात सावळा गोंधळ पाहायला मिळाला. अशातच नागपूरच्या गोधनी नगर पंचायतीच्या निवडणुकीतही मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. एका मतदान केंद्रावर पुरवणी मतदार यादी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नव्हती. यामुळे अनेक मतदारांना मतदान न करता परत जावे लागले. या प्रकारामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी उसळली. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. 'तुम्ही भाजपला विकल्या गेले आहे का?', असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

नेमकं घडलं काय?

२ डिसेंबरला गोधनी नगर पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत होती. मात्र, दुपारनंतर पिटेसूर मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीत नाही, असं बोलून पुन्हा परतीच्या मार्गावर पाठवलं. पण मतदारांची नावे पुरवणी यादीत होती. मात्र, केंद्रातील अधिकाऱ्यांकडे नव्हती असं सांगण्यात आलं. यामुळे १५० मतदारांना मतदान नाकारण्यात आले.

या प्रकरणामुळे काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. यावेळी केंद्रावर एकच गोंधळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेत्या कुंदा राऊत तातडीने पिटेसूर मतदान केंद्रावर दाखल झाल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना मतदारांना मतदानाचा हक्क बजावू द्यावा, अशी विनंती केली. मात्र, अधिकाऱ्यांनी 'यादी मागवलीये' असं सांगत टाळाटाळ केली.

कुंदा राऊत यांना संताप अनावर झाला. 'तुम्ही भाजपला विकल्या गेले आहे का?', असा प्रश्न विचारत त्यांनी अधिकाऱ्याला झापलं. 'तुम्ही भाजपचं काम करीत आहात का? त्यांनी तुम्हाला पैसे दिलेत का? भाजपचं काम करत असाल तर, गळ्यात भाजपचं दुपट्टा घाला', अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

Maharashtra Live News Update : हिवरखेडच्या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात? आमदार मिटकरींच्या आरोपानंतर चौकशी समिती गठित

रॉकस्टार सूनबाई! डोक्यावर पदर हाती गिटार, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील नवरी आहे तरी कोण?

Lonavala Places : फ्रेंड्ससोबत फिरायला जाताय? मग या ठिकाणी नक्कीच जा

मृत्यूपूर्वी Whatsapp स्टेट्स ठेवलं, पोलीस हवालदाराचा मृत्यू; पोलीस दलात शोककळा

SCROLL FOR NEXT