NASHIK FAKE GODMAN SCAM saam tv
महाराष्ट्र

11 लाखांचे 15 कोटी करणारा नवा खरात, श्रीमंतीची हौस, भोंदूनं पाडला पैशांचा पाऊस?

Black Magic Scam in Nashik: पुरोगामी महाराष्ट्राला भोंदूगिरीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चाललाय. दररोज नवनवे खरात राज्यात निर्माण होताहेत. मात्र, सुशिक्षित नागरिक बुद्धी गहाळ ठेवून या भोंदूंच्या कच्छपी का लागतात?... हाच खरा सवाल आहे. भोंदूगिरीचा नवा प्रकार कुठे घडलाय?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Snehil Shivaji

५०० रुपयांच्या या कोऱ्या करकरीत नोटांची बंडलं पाहा... समोर नोटांचा डोंगर अन् मान झुकवून बसलेला हा बाबा पाहा, इथंच बसा... लक्ष्मीची सेवा करा... पाया पडा अन् माथा टेका असा दावा करणारा हा पाठमोरा माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून, मंत्रतंत्राने पैशांचा पाऊस पाडणारा भोंदू बाबा हिराचंद बर्डे आहे... होय... १५ कोटींच्या नोटांच्या पावसाचं आमिष दाखवून, तब्बल ११ लाखांचा गंडा घालण्याची या भोंदू बाबाची ब्लॅक मॅजिक मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती, पाहा...

राजाराम शेलारसह त्यांच्या 4 मित्रांनी प्रत्येकी 1 हजारांच्या बदल्यात भोंदूनं दोन लाख केल्याचं दाखवत विश्वास संपादित केला

5 जणांनी 11 लाख दिले तर 15 कोटींचा पाऊस पाडेन असं सांगितलं आणि रोखीनं ऑनलाईन त्यानं 11 लाख घेतले

पुजा करतांना नारळातून स्फोट करुन चमत्कार करत 3 कोटींच्या नोटांचा पाऊस पडल्याचं सांगत पैसे गोणीत भरुन 7 दिवस पूजा करण्यास सांगितलं

फिर्यादीनं गोणी तपासली असता नोटांच्या बंडल मधील पहिली नोट खरी उर्वरित नोटा नकली असल्याचं दिसलं

भोंदू बाबाला ही माहिती दिल्यानंतर पुन्हा अमावस्येच्या रात्री स्मशानात नग्न होऊन अघोरी पूजा करण्यास सांगितलं

या पूजेस नकार दिल्यानंतर भोंदूनं फिर्यादीस गायब करण्याची आणि मारुन टाकण्याची धमकी देत घाबरवलं

भोंदू बाबाच्या अघोरी धमक्यांना न घाबरता, शेलार यांनी थेट अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. अन् तिथंच या भोंदूच्या पापाचा पर्दाफाश झाला. पोलिसांत तक्रार दाखल होताच, जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी या भोंदू बाबा हिराचंद बर्डेच्या मुसक्या आवळल्या.

नाशिकमध्ये भोंदू खरातने सुशिक्षितांपासून थेट मंत्र्यांपर्यंत सर्वांना कसा चुना लावला, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. पण तरीही, कष्टाची भाकर सोडून... झटपट श्रीमंतीची हाव असणारे लोक अशा भोंदूंच्या जाळ्यात सहज अडकतात, त्यामुळे जितका दोष या भोंदू बाबांचा आहे तितकाच दोष २१ व्या शतकातही, अघोरी पूजेला बळी पडत अक्कल गहाण ठेवणाऱ्या सुशिक्षितांचा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भोंदूंच्या मुसक्या तर आवळायलाच हव्यात मात्र नागरिकांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT