नाशिकमध्ये भोंदू ज्योतिषी अशोक खरात अटकेत
महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप
रुपाली चाकणकरांवर ठोंबरे यांचा घणाघात
खरातला राजकीय अभय असल्याचा आरोप
Nashik Ashok Kharat Rupali Chakankar Rupali Thombre Allegations नाशिकमध्ये बुधवारी स्वतःला ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखणाऱ्या अशोक खरातच्या भोंदूगिरीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. खरातला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली असून आता त्याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे राजकीय अभय असल्याचे रुपाली ठोंबरे यांनी भर पत्रकार परिषदेत म्हटले. ठोंबरे यांच्या या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ कॅप्टन खरात (६७ ) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी १८ मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. भविष्य बदलण्याचे आमिष दाखवून महिलांची वैयक्तिक अडचण सोडवण्याच्या बहाण्याने तो त्यांचा लैंगिक शोषण करत असल्याचे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणात एकूण ५८ व्हिडिओ समोर आले आहेत. या प्रकरणी आत SIT गठीत करण्यात आली आहे.
कॅप्टन अशोक खरात याला अटक केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील मिरगावचे ईशानेश्वर मंदिर चर्चेत आले आहे. १६ ऑगस्ट २०१० रोजी या मंदिराची स्थापना केली होती. याच मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर कार्यरत आहेत.धक्कादायक म्हणजे रूपाली चाकणकर यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या खरात याच्या पायाशेजारी बसलेल्या पाहायला मिळाल्या.
दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी भर पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर यांचे खरातला अभय असून पोलिसांवर दबाव आणून त्या पुरावे नष्ट करू शकतात असेही त्यांनी यावेळेस म्हटलं. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा ही विनंती ठोंबरे यांनी केली. खरात प्रकरण चाकणकरांच्या अंगलट येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.