Crime: नाशिकमध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Crime: नाशिकमध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रजासत्ताक दिनी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिकः प्रजासत्ताक दिनी (Republic Day) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक (Nashik) मध्ये महापालिकेच्या (Municipal Corporation) महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा (officer) मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सुवर्णा वाझे- जाधव असे त्यांचे नाव आहे. सध्या घटनास्थळावर पोलीस (Police) आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्यांनी तपास कार्य देखील सुरू केले आहे. मात्र, अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह सापडतो काय, याविषयी तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण येत आहे.

हे देखील पहा-

डॉ. सुवर्णा वाझे- जाधव या आरोग्य विभागात कंत्राटी वैद्यकीय (Medical) अधिकारी या पदावर कार्यरत होते. आज नाशिकमधील वाडीवऱ्हे परिसरात एका वाहनात त्यांचा मृतदेह सापडला आहे. याची धक्कादायक माहिती परिसरामधील नागरिकांनी पोलिसांना (Police) दिली. यानंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात की आणखी काही, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

मात्र, या घटनेने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये (Employees) मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. नाशिकची नेमकी वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न परत एकदा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. नाशिकमध्ये सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. महापालिकेत देखील हा उत्साह होता. सारे ध्वजारोहण समारंभात व्यस्त होते. मात्र, काही वेळातच महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाझे- जाधव यांचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक बातमी येऊन धडकली आणि साऱ्यांनाच धक्का बसला आहे.

यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. आता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. नाशिकमध्ये भयंकर वेगाने गुन्हेगारी वाढली आहे. मागील काही दिवसांत तरी एकाच आठवड्याभरात ३ खून झाले आहेत. नाशिककरांनी बघितले, यामध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याला संपवण्यात आले आहे. त्याप्रकरणी चांगलेच वातावरण तापले आहे. विविध पक्षांनी आंदोलन देखील केले.

मात्र, आता चक्क एका महिला अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा. हा घातपाताचा प्रकार आहे की, आणखी काही याचा शोध घ्यावा, असा सूर महापालिका कर्मचाऱ्यांमधून निघत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT