अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि रोजच होणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे नाशिकमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंमली पदार्थांच्या विक्रीत वाढ, गाड्यांची तोडफोड, भररस्त्यात कोयत्याने वार, चौकाचौकात होणारे खून यामुळे नाशिक हे गुन्ह्यांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात मुख्य पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहे.
शहरातील १२ पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून यामध्ये ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर शहरातील भाजपच्या तीन आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली होती. या आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता नाशिकचे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी १२ पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. मात्र या बदल्यानंतर तरी हाताबाहेर गेलेली गुन्हेगारी आटोक्यात येईल का? हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
1) पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड - अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर
2) पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग नवलसिंग राजपूत - गंगापूर पोलीस ठाणे, नाशिक शहर
3) पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे - अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर
4) पोलीस निरीक्षक प्रकाश आत्माराम अहिरे - भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर
5) पोलीस निरीक्षक उमेश नानाजी पाटील - सायबर पोलीस ठाणे, नाशिक शहर
6) पोलीस निरीक्षक संतोष बबनराव नरुटे - मुंबईनाका पोलीस ठाणे, नाशिक शहर
7) पोलीस निरीक्षक रणजित पंडीत नलवडे - सातपूर पोलीस ठाणे, नाशिक शहर
8) पोलीस निरीक्षक संजय मारुती पिसे - आडगांव पोलीस ठाणे, नाशिक शहर
9) पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील - एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी, नाशिक शहर
10) पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे - इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर
11) पोलीस निरीक्षक तुषार मुरलीधर अढावु - शहर वाहतूक शाखा, युनिट क्रमांक 1, नाशिक शहर
12) पोलीस निरीक्षक रियाज ऐनुद्दीन शेख - सातपूर युनिट, शहर वाहतूक शाखा, नाशिक शहर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.