Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Nashik News : नाशिकच्या चामर लेणीच्या पायथ्याशी २२ जूनला अज्ञात व्यक्तीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय पोलिसांना होता

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चामर लेणीच्या पायथ्याशी एका अज्ञात ट्रक चालकाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र घातपात असल्याचा संशय पोलिसांना होता. शिवाय ट्रक चालकाची ओळख पटविण्याचे आव्हान देखील नाशिक पोलिसांसमोर होते. तपासादरम्यान सदर ट्रक चालकाची हत्या लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

नाशिकच्या चामर लेणीच्या पायथ्याशी २२ जूनला अज्ञात व्यक्तीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय पोलिसांना होता. तसेच ट्रक चालकाची ओळख पटविण्याचे आव्हान देखील पोलिसांसमोर होते. दरम्यान खून करणाऱ्या संशयतांचा पोलिसांनी शोध घेतला असता मृत उमेश नागप्पा अंबिगर (रा. मरकुंडागाव, कर्नाटक) असे नाव असल्याचे समोर आले होते.  

पैशांची मागणी करत बेदम मारहाण 

दरम्यान संशयितांनी लुटमारीच्या उद्देशाने ट्रक चालकाचा खून केल्याचे समोर आले आहे. सिगरेट पेटवण्याच्या बहाण्याने चालकास उठवून त्याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला मारहाण केली. तसेच त्याच्याकडून दोन एटीएम कार्ड काढून घेऊन जीवे ठार मारण्याच्या धमकी देऊन पिनकोड घेत त्याला मारहाण केली. सदरचा पिनकोड चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर चौघांनी पुन्हा ट्रक चालकास बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला असल्याची कबुली संशयितांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चारजण ताब्यात  

गुन्हे शोध पथकाच्या युनिट एकने सीसीटीव्हीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे एक संशयास्पद मोटरसायकल निदर्शनास आली होती. हे संशयित म्हसरूळ परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत संशयित विजय खराटे, संतोष गुंबाडे, अविनाश कापसे, रवी शेवरे या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT