Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : चोरीच्या संशयातून गावकऱ्यांकडून तिघांना चोप; दिंडोरी खतवड येथील प्रकार, तिघे जखमी

nashik News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील खतवड येथे शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दुकानात तिघा अज्ञातांनी चोरी करण्याची तक्रार दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तिघा अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा चोरीचा प्रयत्न केला जात असताना स्थानिक नागरिकांनी तिघांना पकडत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना दिंडोरीच्या खतवड येथे घडला आहे. यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील खतवड येथे शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दुकानात तिघा अज्ञातांनी चोरी करण्याची तक्रार दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तर काल रात्रीच्या सुमारास दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एक दुकान आणि गॅरेजच्या परिसरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याची माहिती ग्रामस्थांना समजली. यानंतर ग्रामस्थांनी तिघांना पकडले. 

तिघांना केली बेदम मारहाण 

मात्र चोरीचा प्रयत्न करणारे तिघांना पकडून स्थानिक नागरिकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या बाबात दिंडोरी पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी गावात येत तिघांनाही गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेतले. यानंतर त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिघांवर उपचार करण्यात आले. 

रुग्णालयातून झाले फरार 

पोलिसांनी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी उपचार केल्यानंतर तेथेच दाखल होते. दरम्यान हे तिघे जण  दिंडोरी परिसरात विविध ठिकाणी चोरी करत असल्याचा संशय त्यांच्यावर आहे. मात्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाही तिघेजण फरार झाले असून दिंडोरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

SCROLL FOR NEXT