Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : शेअर मार्केटमध्ये तोटा; दोघा मित्रांनी निवडला चोरीचा मार्ग, दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

Nashik News : नाशिकच्या रामवाडी परिसरात एका घरात घुसून महिलेची ३ तोळ्यांची पोत चोरी झाल्याची घटना घडली असता या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असताना धक्कादायक माहिती समोर आली

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची सवय लागली असल्याने नुकसान होत असताना देखील यात पैसे गुंतवणूक करण्याचे थांबविले नाही. यात शेअर मार्केटमधील फॉरेक्स आणि ट्रेडिंगमध्ये तोटा झाल्याने पैशांची चणचण भासू लागली होती. यामुळे पैसे मिळविण्याच्या उद्देशाने चोरीचा मार्ग निवडत घरात घुसून चोरी करण्यास सुरवात केली. दोघा मित्रांचा यात सहभाग असून पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. 

नाशिक शहरात घडलेल्या या प्रकारात पोलिसांनी उपनगर परिसरातून दोघे संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रथमेश उशीर आणि जोएल म्हस्के अशी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. प्रथमेश व जोएल याना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीची सवय लागली होती. यातून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दोघे तरुण चोर बनले होते. दरम्यान नाशिक शहरातील अनेक भागात चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. 

घरात घुसून पोत लांबविली 
याच दरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रामवाडी परिसरात महिलेचा पाठलाग करत महिलेच्या घरात घुसून गळ्यातील ३ तोळ्यांची पोत चोरट्यांनी लुटून नेली होती. हि धक्कादायक घटना उघडकीस आली असता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु असताना दोघे चोरटे नाशिक उपनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. 

दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने उपनगर परिसरात सापळा रचून दोघा चोरांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरी केलेली सोन्याची पोत असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यात दोघांनीही शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. तर पोलिसांकडून आणखी तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Narendra Modi: सामान्य चहावाला ते देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदींचे हे फोटो पाहिलेच नसतील

Pratapgad Fort History: शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आणि ऐतिहासिक महत्त्व, प्रतापगड किल्ल्याचा इतिहास

Crime News : प्रसिद्ध मॉलमध्ये सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी; IT कर्मचाऱ्याला बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकार?

Beed News: बीडकरांचे स्वप्न साकार : बीड-अहिल्यानगर रेल्वेचा पहिला टप्पा सुरू|VIDEO

SCROLL FOR NEXT