Nashik Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime : सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आयुष्य संपवले, पत्नीच्या मैत्रिणीवरही गुन्हा दाखल

Nashik News : पत्नीच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Namdeo Kumbhar

Nashik Crime : नाशिकमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना (Crime News) घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Police) पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय. पत्नीच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

सासरच्या जाचास कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमधून (Nashik News) समोर आली आहे. पत्नीसह सासरच्या मंडळीने जावयास मानसिक व आर्थिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुगंधा पवार, हरी काळू देवरे, रत्ना हरी देवरे, संध्या मनोहर मांडवळे आणि मोना गणेश जेऊघाले या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत.

विशेष बाब म्हणजे पत्नी आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून माझा मानसिक छळ करत असल्यास सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. याबाबत प्रभाकर हरी पवार (रा.सावतानगर,सिडको) यांनी फिर्याद देण्यात आली. पवार कुटुंबीय बाहेरगावी असताना संशयित सून सुगंधा, तिचे आई-वडील, बहीण व बहि‍णीची पुणेस्थीत मैत्रीण आदींनी मृत मुलगा हेमंत प्रभाकर पवार (४५ रा.नारायण हाईटस,बडदेनगर) यास मानसिक व आर्थिक त्रास दिला. या त्रासास वैतागून मुलगा हेमंत पवार याने गेल्या बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून आयुष्य संपवले. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: पुण्यात अमित शहांच्या हस्ते अजित डोवालांचा सन्मान

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT