Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : पोलीस असल्याची बतावणी करत वृध्दाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik News : लाईट बिल भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना दोघा अज्ञात चोरट्यांनी गाठत आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही हातात सोने घालून जाऊ नका.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या येवला शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या गंगा दरवाजा परिसरात राहणारे वयोवृध्द व्यक्तीस गाठून गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस असल्याची बतावणी करत बोटातील अंगठी घेऊन पसार झाले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.  

नाशिकच्या (Nashik) येवला शहरातील भर दिवस हि घटना घडली आहे. शहरातील गंगा दरवाजा परिसरात वास्तव्यास असलेले केदार भावसार हे लाईट बिल भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना दोघा अज्ञात चोरट्यांनी गाठत आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही हातात सोने घालून जाऊ नका. सर्व सोन तुमच्या रुमालात बांधून घरी घेऊन जा असे सांगत त्यांच्या बोटातील ३ तोळ्यच्या दोन अंगठ्या रुमालात बांधत (Crime News) त्यांना खिशात घालण्यास सांगितले. यानंतर ते दोघे तेथून निघून गेले. 

दरम्यान भावसार हे घरी आल्यावर त्यांनी खिशात ठेवलेला रुमाल उघडून पाहिले असता त्यात काहीच नसल्याने दिसून आले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी हातचलाखी करत त्यांना लूटल्याची सर्व घटना (CCTV) सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भावसार यांनी पोलिसात तक्रार दिली असून सीसीटीव्हीच्या आधारे येवला शहर पोलिस त्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT