Nashik News
Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: भररस्‍त्‍यावर प्राध्‍यापक महिलेची छेड; पती व भावाला केली मारहाण

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात एका प्राध्यापक महिलेची टवाळ खोरांकडून पती व भावासमोरच छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर विचारणा करणाऱ्या महिलेच्या पती आणि भावलाच टवाळखोरांनी मारहाण (Crime News) करत महिलेला देखील धक्काबुक्‍की करून त्यांच्या चारचाकी वाहनाची काच फोडून नुकसान केले. (Breaking Marathi News)

सदर महिलेचा पती व भाऊ कुणाल हे (Nashik) देवळाली कॅम्प येथील सम्राट हॉटेलमधून बाहेर पडले. त्याच वेळी रस्त्यावर उभ्या तिघा अनोळखी टवाळखोरांनी जवळ येऊन प्राध्यापक महिलेला अपशब्‍द बोलले. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेचे पती घस्ते आणि भाऊ कुणाल यांनाच या टवाळखोरांनी शिवीगाळ करत मारहाण केली. एवढ्यावर न थांबता या टवाळखोरांनी सदर महिलेला देखील धक्काबुक्की केली आणि बाजूलाच उभ्या असलेल्या त्यांच्या कारची काच फोडून नुकसान देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

नाशिक शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही की काय असाच सवाल नागरिक उपस्थित करत आहे. सर्व रस्त्यावर एका महिलेची अशाप्रकारे छेड काढून तिच्या पती व भावाला मारहाण केल्याने महिलांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शहर परिसरातील महिलांमध्ये देखील भीतीच वातावरण पसरले आहे. शहरात महिलांचे मंगळसूत्र चैन चोरीच्या घटनादेखील बंद व्हायचे नाव घेत नसल्याने महिला स्वतःला असुरक्षित समजत आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी विरोधात कठोरातील कठोर पावले उचलण्याची अशी मागणी नागरिक करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

SCROLL FOR NEXT