Gram Panchayat Funds Fraud Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: खळबळजनक! ग्रामपंचायत निधीतील ३० लाखांचा अपहार, पोलिसांनी उपसरपंचाला ठोकल्या बेड्या

Gram Panchayat Funds Fraud: नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निधीची गैरव्यवहार झाल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी उपसरपंच आणि पॅनलप्रमुखाला अटक केलीय.

Rohini Gudaghe

अजय सोनवणे, साम टीव्ही मनमाड

ग्रामपंचायत निधीची गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी उपसपंच आणि पॅनलप्रमुखाला अटक करण्यात आल्याची घटना नाशिक जिल्ह्यामधून समोर आलीय. काम न करताच लाखो रुपये लुटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालूक्यातील निवाणे ग्रामपंचायतमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

उपसरपंचाला अटक

तत्कालीन सरपंच आणि पेसा सदस्यांचा अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत पेसा आदिवासी निधीसह ग्रामपंचायतीच्या विविध निधीतील ( Nashik Crime News) कामे न करता लाखो रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी माजी उपसपंच महेश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. निवाणे ग्रामपंचायतीवर २०१६ ते २०२१ काळात त्यांची सत्ता होती. याकाळात त्यांनी आदिवासी पेसा निधी अंतर्गत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला ३० लाख ४९ हजाराचा निधी काम न करताच अपहार केल्याचं पंचायत समितीच्या ऑडिटमध्ये समोर (Gram Panchayat Funds) आलंय.

पोलिसांनी केली कारवाई

याबाबत कळवण पोलिसांत तक्रार दाखल झाली (Niwane Gram Panchayat Scam) होती. त्यानंतर या प्रकरणी आठ दिवसापुर्वी तिघांना अटक होऊन त्यांना जामिनावर सुटका झाली. मात्र, माजी उपसरपंच महेश पाटील हा यातील मुख्य सुत्रधार असल्याचं समोर आलंय. त्यानेच सगळी रक्कम आपल्या अकाउंटवर जमा केल्याचे पोलीस तपासात पुढे निष्पन्न झालं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय.

ग्रामपंचायत निधीतील लाखोंचा अपहार

ग्रामपंचायत निधीतील लाखोंचा अपहार झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यात (Nashik News) घडली. याप्रकरणी आता उपसरपंचाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे निवानी गावात मोठी खळबळ उडाली होती. ऑडिट झाल्यानंतर ग्रामपंचायत निधीतील सुमारे तीस लाख रूपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी आता उपसरपंचावर कारवाई करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT