Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: बापानेच केला मुलीचा खून; घरात असताना दोघांमधील वादातून कृत्‍य

बापानेच केला मुलीचा खून; घरात असताना दोघांमधील वादातून कृत्‍य

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फसणारा प्रकार सिडको परिसरातील अंबड लिंक रोड चुंचाळे शिवारातील रामकृष्णनगर येथील शिव व्हीला अपार्टमेंट येथे घडला. शाब्दिक वादातून बापाने मुलीचा खून (Crime News) केल्‍याचा प्रकार झाला आहे. (Letest Marathi News)

सिडको परिसरातील रामकृष्णनगरात वास्‍तव्‍यास असलेले संशयित रामकिशोर भारती (वडील) व ज्योती भारती हे घरी होते. या दरम्‍यान त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर रामकिशोर भारती यालपा याचा राग अनावर झाल्याने त्याने त्याच्याच मुलीचा म्हणजेच ज्योतीचा घरातील ओढणीच्या सह्याने गळा आवळून खून केला.

मुलगी पळून जात असल्‍याने वाद

सदर मुलगी वारंवार घर सोडून पळून जात असल्याने त्यांच्यात वाद झाले आणि याच वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून संशयित रामकिशोर भारती यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या पाटोदा तालुक्यात अवकाळीने जांभूळ व केळी पिकांचं प्रचंड नुकसान

Suvarnadurga Fort : मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे सुवर्ण प्रतीक! सुवर्णदुर्ग किल्ल्याचे जुने नाव काय?

Diabetes Risk: या 6 सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, वेळीच व्हा सावध

Snake Eggs: घराजवळ किंवा बागेत दिसलेली अंडी सापाची की पक्ष्याची? 'या' सोप्या पद्धतीने ओळखा फरक; चुकूनही 'ही' चूक करू नका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT