Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : कमी पैसे मिळाल्याचे सांगत वृद्ध दाम्पत्याला लुबाडले; बँकेतील सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Crime News Nashik : कॅश काउंटरवरून रक्कम घेतली. त्याच ठिकाणी कॅश काउंटर जवळ उभे राहून काढलेले पैसे मोजत होते. यावेळी दोघा भामट्यांनी तुम्हाला कमी पैसे मिळाले असल्याचे सूर्यभान कडलग यांना सांगितले.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या वृद्ध दाम्पत्याला गंडा घातल्याचा प्रकार नाशिकच्या पिंपळगाव येथे समोर आला आहे. चिंचखेड रस्त्यावरील बँक ऑफ इंडिया शाखेत वृद्ध जोडप्याने पैसे काढले असता मोजून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी ३३ हजार रुपयांची रक्कम हातचलाखी करत घेऊन पसार झाले आहेत. या प्रकाराने वृद्ध दाम्पत्य हतबल झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आहेगाव येथील सूर्यभान यशवंत कडलग हे आपल्या पत्नीसह बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी रांगेत उभे राहून कॅश काउंटरवरून रक्कम घेतली. त्याच ठिकाणी कॅश काउंटर जवळ उभे राहून काढलेले पैसे मोजत होते. यावेळी दोघा भामट्यांनी तुम्हाला कमी पैसे मिळाले असल्याचे सूर्यभान कडलग यांना सांगितले. 

सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद 

दरम्यान वृद्धाला बोलण्यात गुंतवणूक दोघांनी मिळून हातचलाखी करत त्यांचे ३३ हजार रुपये घेऊन दोघे भामटे पसार झाले. काही वेळा नंतर कडलग यांच्या हा प्रकार लक्षात आला. मात्र तोपर्यंत ते दोघेजण तेथून फरार झाले होते. यानंतर त्यांनी पिंपळगाव पोलिसात धाव घेत पोलिसात तक्रार दिली आहे. वृद्ध जोडप्याला हातचलाखीने कसे लुटल्याचा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे दोघांचा शोध घेत आहे.

दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या
लातूर : लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी चोरी केलेल्या एकूण २० दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरीचे दोन गुन्हे, गांधी चौक पोलीस ठाणे लातूर येथे दाखल होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईत चार जणांना ताब्यात घेत दहा लाख ६५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT