Nashik Crime
Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : घर खाली करण्यासाठी बिल्डरकडून सुपारी; वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून धमकावले, बिल्डरसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिक शहरात प्राईम लोकेशनवर राहणाऱ्या वृद्ध जोडप्यांच्या घरावर बिल्डरांची नजर होती. हे घर खाली करून देण्यासाठी (Nashik) बिल्डरने सराईत गुन्हेगारांना सुपारी दिली. या वृद्धांच्या घरी दरोडा टाकून मारहाण करून घरातील कागदपत्रे चोरी केल्याची धक्कादायक घटना कॉलेज रोड परिसरात घडली. (Police) पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी बिल्डरसह तिघांना ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात २३ एप्रिलला तपस्वी बंगल्यात जाऊन रात्रीच्या सुमारास वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून दोन इसमांनी त्यांच्याकडील दागिने, महत्त्वाचे कागदपत्र,पासपोर्ट चोरून नेल्याची (Crime News) घटना घडली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपस नाशिक पोलिसांनी (Nashik Police) करून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. संदीप रणबावळे, महादेव खंदारे असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१० टक्के कमिशनवर दिली सुपारी 

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदार अरुण गायकवाड, नंदकिशोर रणबावळे आणि एक विधी संघर्षित बालक यांच्या साथीनं हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी यातील संदीप रणबावळे याची अधिक विचारपूस केली असता धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. एका बिल्डरने या वृद्ध दाम्पत्याकडून घर खाली करून दिल्यास तुम्हाला ८ ते १० टक्के कमिशन देईल; अशी सुपारी दिल्याचं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी एका बिल्डरला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाइल, कागदपत्र असा एकूण १४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. नाशिक शहरात बिल्डरकडून लोकांची फसवणूक आणि वृद्ध दाम्पत्यांना गुंड कडून धमकवण्याचे अनेक घटना घडलीय, पुढील कारवाईसाठी त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

SCROLL FOR NEXT