Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : सख्खा भाऊ बनला वैरी; मालमत्तेसाठी लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

Nashik News : वडिलोपार्जित फ्लॅट असून तो विकण्याचा आग्रह लहान भाऊ आकाश करीत होता. मात्र मोठा भाऊ मयंकचा त्यास विकण्यास विरोध करीत होता

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकरोड भागात असलेले राहते घर विकण्याचा आग्रह लहान भावाने केला. मात्र मोठ्या भावाचा घर विकण्यास विरोध केल्याने लहान भावाने मोठ्या भावाची (Crime News) हत्या केली. उपनगर पोलीस ठाणे (Nashik) हद्दीतील समर्थ रामदास स्वामीनगर लेन क्रमांक एक येथे ही घटना आज दुपारी घडली. (Tajya Batmya)

मयंक चंद्रकांत जाधव (वय ३४) असे घटनेतील मृताचे नाव आहे. मयंक जाधव याचा लहान भाऊ आकाश चंद्रकांत जाधव (वय ३२) व त्याची आई असा परिवार आहे. यांचे नाशिकरोड भागात वडिलोपार्जित फ्लॅट असून तो विकण्याचा आग्रह लहान भाऊ आकाश करीत होता. मात्र मोठा भाऊ मयंकचा त्यास विकण्यास विरोध करीत होता. यावरून दोन्ही भावामध्ये अनेकदा वाद विवाद झाले. या वादाला कंटाळून यांची आई मुलीकडे राहत होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज सकाळपासून या भावामध्ये यावरून वाद सुरु होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने लहान भावाने धारदार शास्त्राने मोठा भाऊ मयंक याच्या डोक्यावर, पोटावर हल्ला चढवला. घाव वर्मी लागल्याने मयंक जागीच कोसळला व मयत झाला. याबाबत उपनगर पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब डुकळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व त्याचे पथक घटनास्थळी पोहचले व पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आकाश जाधव यास ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरू

Rain Alert: पुढचे १० तास महत्वाचे! वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, ताशी ७० ते ८० वेगाने वारे वाहणार; महाराष्ट्रासह १६ राज्यांना इशारा

आधी ज्योतिष्याला OSDपद, आता चित्रपट निर्मात्याची थेट कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं खळबळ

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते दिल्लीसह 9 मार्गांवर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT