Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: कॉलेजचे तरूण निघाले मोबाइल चोर; कारण उघड झाल्यानंतर सगळ्यांनाच बसला 'शॉक'

कॉलेजचे तरूण निघाले मोबाइल चोर; कारण उघड झाल्यानंतर सगळ्यांनाच बसला 'शॉक'

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : मौज मजा, सुख चैनीसाठी मोबाईल खेचून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला (Nashik) नाशिकच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने बेड्या ठोकल्‍या. तसेच त्यांच्याकडून (Theft) चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हे संशयित हे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मोबाईल खेचून जबरी लूटीच्या घटना समोर आल्या होत्या. या घटना लक्षात घेता नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ आणी महेश साळुंखे यांनी तांत्रिक विश्लेषण करून सिडको येथील शांतीनगर भागात राहणार संशयित चेतन निंबा पवार, पौर्णिमा बस स्टॉप परिसरात राहणारा संशयीत शशिकांत सुरेश अंभोरे, जुने सिडको परिसरात राहणार विजय सुरेश श्रीवास्तव या संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसुन चौकशी केली.

२२ मोबाईल जप्‍त

चोरट्यांकडून शहर परिसरातून चोरलेले एकूण २२ मोबाईल आणि चोरीच्या वापरलेली दुचाकी असा एकूण ४ लाख ५३ हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आडगाव २, सातपूर २, मुंबई नाका १ आणि सरकारवाडा पोलीस ठाणे १ अश्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. मौज मजा करन्यासाठी हे संशयित मोबाईल चोरी करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT