Nashik News Update Saamtv
महाराष्ट्र

Nashik Crime News: जुन्या भांडणाचा राग... नाशिकमध्ये भररस्त्यात तरुणावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोरांचा शोध सुरू

Nashik News Update: पुर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

अभिजित सोनावणे

Nashik Crime News: नाशिकच्या म्हसरुळ परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Crime News In Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या (Nashik) चाणक्यपुरीमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला आहे. गौरव थोरात असे या हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. पुर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरूणाला उपचार करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

पती पत्नीच्या वादात २ मुलांचा अंत...

अहमदनगर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने दोन मुलांना विहिरीत फेकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT