Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : मुजोरी! हप्ता थकला, बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी तरूण शेतकऱ्यावर केला जीवघेणा हल्ला

Nashik News : देवळा येथील एका फायनान्स बँकेकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. याची फेड नियमितपणे मागील दोन वर्षापासून सुरु आहे कर्जाचे नियमित हफ्ते भरले जात होते. मात्र मागील महिन्याचा हप्ता थकला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : शेती कामासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा एका महिन्याचा हफ्ता थकला होता. हा हप्ता वसूल करण्यासाठी बँक वसूली कर्माचारी शेतकऱ्याच्या घरी गेला. यानंतर त्याने थेट तरुण शेतकऱ्यावर तलवारीने हल्ला केल्याची घटना नाशिकच्या कळवण तालूक्यातील निवाणे गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील नावाने या गावातील शेतकरी किसन नामदेव बोरसे असे घटनेत जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. तलवारीच्या हल्ल्यात किसन बोरसे यांच्या डोक्याला व पाठीला जखमा झाल्या आहेत. दरम्यान किसन याच्या आईने देवळा येथील एका फायनान्स बँकेकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. याची फेड नियमितपणे मागील दोन वर्षा पासून सुरु आहे. कर्जाचे नियमित हफ्ते भरले जात होते. मात्र मागील महिन्याचा हप्ता थकला.   

वसुलीसाठी गावात पोहचले 

किसन बोरसे यांच्या आईने घेतलेल्या कर्जाचा मागील महिन्याचा हफ्ता थकल्याने बँक वसूली कर्माचाऱ्याने वसुलीसाठी गाव गाठले. बोरसे यांच्या घरी गेल्यानंतर या कर्मचाऱ्याने त्याला शिवीगाळ केली. यावेळी किसान बोरसे यांनी दुपार पर्यंत पैसे देतो असे सांगितल्यानंतर वसूली कर्मचारी तेथून निघून गेले. मात्र शेतकऱ्याने दिलेल्या वेळेच्या आधिच ते पुन्हा शेतकऱ्याच्या घरी पोहचत पैशांची मागणी केली.  

शिवीगाळ करत शेतकऱ्याला मारहाण 

दरम्यान त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ तर केलीच, शिवाय मारहाण सुध्दा केली. त्यानंतर तलवार काढत त्यांनी शेतकरी किसन बोरसे याच्यावर डोक्यात व पाठीवर तलवारीने हल्ला केला. हा प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेत जखमी झालेल्या किसन याला कळवण येथिल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT