Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: वर्क फ्रॉम होम करताय? मग सावधान! तुम्हालाही बसू शकतो लाखोंचा गंडा

Cyber Crime News: तुम्हाला देखील आपल्याला वर्क फ्रॉम होम मिळावं असं वाटतं असेल.

Ruchika Jadhav

Nashik News: राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच अनेक व्यक्ती कोरोना नंतर ऑफिसला जाण्यासाठी कंटाळा करत आहेत. अशात वर्क फ्रॉम होम मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं. तुम्हाला देखील आपल्याला वर्क फ्रॉम होम मिळावं असं वाटतं असेल. मात्र वर्क फ्रॉम होम करण्याआधी थोडं सावध व्हा. (Crime News)

वर्क फ्रॉम होम धोक्याचे

सध्या सर्वच व्यक्ती सोशल मीडियावर ॲक्टिव आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा अकाऊंटवर वर्क फ्रॉम होमची अनेक कामे आहेत. जाहिराती आणि अन्य काही गोष्टींतून नागरिक पैसे कमावत आहेत. मात्र नाशकात असंच वर्क फ्रॉम होम करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

लाखोंची झाली फसवणूक

नाशिकच्या (Nashik) सिडको परिसरातील खुटवड येथे एक चोरीची घटना घडली आहे. येथे एका महिलेला वर्क फ्रॉम होम देऊन लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

घरी बसून काम मिळणार म्हणून या महिलेने टेलिग्रामवरून काम स्वीकारले. यामध्ये तिला विविध टास्क आणि प्रश्न देत वारंवार अकाउंटमध्ये पैसे भरण्यास सांगितले. या कामातून महिलेची तब्बल 18 लाख रुपयांची फसवून झाली आहे.

क्रेडीट कार्डचे लिमीट वाढवायचे सांगत फसवणुक

शिरसोली (ता.जळगाव) येथील खासगी व्यवसायीक तरुणाच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून (Cyber Crime) सायबर भामट्यांनी चक्क ३४ हजार६८० रुपयांचा चुना लावला. एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिरसेाली (ता. जळगाव) येथील रहिवसी बी. एस. सोनार यांच्या मोबाईलवर दुपारी चार वाजता अज्ञाताचा फोन आला. त्याने मराठीत संभाषण करत आम्ही बँकेतून बोलत असून क्रेडीटकार्ड लिमीट वाढवण्याचे सांगत सोनार यांच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला. आलेला ओटीपी सांगितल्यावर बँक खात्यातून काही क्षणातच ३४ हजार ५८० रुपये परस्पर डेबीट झाल्याचे निदर्षनास आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT