Nashik Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिकमध्ये नदीत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ समोर; पत्नीने भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने रचला कट

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील निफाड-चांदवड परिसरात बेपत्ता तरुणाची हत्या पत्नीने प्रियकर आणि भावाच्या मदतीने केल्याचा धक्कादायक उलगडा झाला असून या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये बेपत्ता असलेल्या तरुणाचा नदीत मृतदेह सापडला

  • शवविच्छेदन अहवालातून हत्या झाल्याचे स्पष्ट

  • पत्नी, प्रियकर आणि भावावर खुनाचा आरोप

  • पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक

अजय सोनावणे, मनमाड

Nashik Nifad Chandwad Murder Case News नाशिकच्या निफाड चांदवड येहे बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मागील महिन्यात मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. या अहवालातून तरुणाची हत्या करून झाल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर त्याला नदीत फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान चौकशी नंतर धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मृत तरुणाच्या पत्नीने तिचा भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने कट रचून हत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शदाब तांबोळी हा १८ फेब्रुवारी रोजी घरातले सामान आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक, मित्रमंडळी तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही शादाब सापडला नाही.

अखेर निफाड पोलीस ठाण्यात त्याची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून तपास सुरू असतानाच २३ फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूल परिसरात नदीच्या पुलाखाली पाण्यात तरंगताना त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पाहणीदरम्यान शदाबच्या तोंडावर, हातपायांवर आणि कंबरेला वजनदार दगडांनी बांधलेले आढळून आले.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केल्यावर आढळून आले की, या खुनाची सूत्रधार त्याची पत्नीच आहे. प्रियकर आणि भावाच्या मदतीने मुस्कान तांबोळी हिने पतीची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले. मात्र तिने असे का केले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

Heatstroke Tips: उष्माघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी करणं टाळा, वाचा कशी घ्यायची काळजी?

Manohar Bhosale: भोंदू मनोहर मामाचा नवा करनामा; प्रसाद म्हणून आंबा,पेरू तीन हजार रुपयाला विकायचा

SCROLL FOR NEXT