NASHIK MURDER SUICIDE CASE HUSBAND KILLS WIFE ENDS LIFE OVER FAMILY DISPUTE Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Nashik Husband Wife Murder Sucide Case Crime News : नाशिकमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या श्रीपुरवडे येथे दुहेरी मृत्यूची घटना

  • पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

  • कौटुंबिक वादातून घटना घडल्याची शक्यता

  • मुलगा-सून घरी आल्यानंतर उघड झाला प्रकार

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

अजय सोनावणे, नाशिक

नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. श्रीपुरवडे येथे पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या दुहेरी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपुरवडे- जायखेडा रस्त्यालगत शेतात वास्तव्यास असलेले मुरलीधर राघो ठाकरे (वय ६५) आणि त्यांची पत्नी यशोदाबाई मुरलीधर ठाकरे (वय ५८) हे दोघे घरी एकटेच होते. त्यांचा मुलगा समाधान ठाकरे व सून हे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, पती-पत्नीमध्ये झालेल्या अंतर्गत कौटुंबिक वादातून मुरलीधर ठाकरे यांनी संतापाच्या भरात कोयत्याने पत्नी यशोदाबाई यांच्यावर वार केल्याचे सांगितले जात आहे.

यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मुरलीधर ठाकरे यांनी विषारी औषध प्राशन करून गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रात्री सुमारे आठच्या सुमारास उघडकीस आली. लग्नसमारंभ आटोपून मुलगा व सून घरी परतले असता घरात अंधार असल्याने त्यांनी घरातील स्विचबोर्ड सुरू केला. त्यावेळी घरात यशोदाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा प्रकार पाहून त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावले.

नागरिकांनी तातडीने ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पाहणी केली. त्यांनी घडलेली परिस्थिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना कळवल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. विभागीय पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोघांचे मृतदेह पुढील तपासासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश हिरे आणि डॉ. स्वराज देशमुख यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. श्रीपुरवडे येथे अंत्यंत शोकाकुल वातावरणात दोघा पती पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

SCROLL FOR NEXT