Nashik Fake Godman Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचं कांड, विधी करण्याच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

Nashik Fake Godman: नाशिकमध्ये अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाने महिलेसोबत भयंकर कृत्य केले. विधीच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

Summary -

  • नाशिकमध्ये भोंदूबाबाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

  • विधीच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

  • महेश गिरी नावाच्या भोंदूवर गंभीर आरोप

  • अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर कारवाई

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन हादरवून टाकणारे खुलासे होत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये आणखी एक भोंदूबाबचं प्रकरण समोर आले आहे. या भोंदूबाबाने महिलेला जाळ्यात अडवून विधी करण्याच्या नावाखाली तिला लॉजवर नेलं. त्याठिकाणी त्याने महिलेवर बलात्कार केला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या लासलगावमध्ये आणखी एका भोंदूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा त्याच्याविरोधात आरोप आहे. महेश गिरी असं या भोंदूबाबाचे नाव असून त्याच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव खडकमध्ये या भोंदूबाबाचा मठ आहे. हा मठ प्रति गाणगापूर मठ म्हणून प्रसिद्ध आहे.

भोंदूबाबा महेश गिरीने समस्यांवर तोडगा काढण्याच्या बहाण्याने कुटुंबाला जाळ्यात ओढले. बाधा झाली सांगत पापनाशक कुंडात अंघोळ करण्यास आणि झाडाला फेऱ्या मारण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने महिलेला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. दैवी विधीच्या नावाखाली महिलेला एकांतात नेण्याचा बहाणा करायचा. नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेऊन महिलेवर भोंदूने बलात्कार केला. महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

दैवी भीती दाखवत भोंदू महेश गिरीने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने अंनिस पदाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनंतर लासलगाव पोलिस ठाण्यात भोंदूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूकडून अनेक महिलांचे शोषण झाल्याची शक्यता पीडित महिलेने वर्तवली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glowing Skin Tips: फ्रिजमधील या ४ गोष्टींनी परत मिळवा त्वचेचा हरवलेला ग्लो; जाणून घ्या ७ सोपे उपाय

काळजाचा थरकाप! जेजुरीत खेळता खेळता दीड वर्षाच्या चिमुकला अचानक गायब झाला, सगळीकडे शोधाशोध, सेफ्टी टँककडे नजर जाताच पालकांना...

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन

KDMC डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द; पोलिसांसमोर सरेंडर होणार

World's first website: इंटरनेटवरील सर्वात पहिली वेबसाईट कोणती होती?

SCROLL FOR NEXT