Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Clash : "मराठी लोगो की औकात क्या? नाशिकमध्ये परप्रांतीयाची मुजोरी, मनसेने माज उतरवला, पाहा व्हिडिओ

Nashik News : नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद चिघळला. गाडीच्या धक्क्यावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं असून मनसैनिकांनी हस्तक्षेप करून परप्रांतीय तरुणाला चोप दिला.

Alisha Khedekar

  • जयभवानी रोड परिसरात मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद उफाळला.

  • गाडीच्या धक्क्यावरून सुरू झालेला वाद हाणामारीत परिवर्तीत झाला.

  • मनसैनिकांनी हस्तक्षेप करून परप्रांतीय इसमाला चोप दिला.

  • दोन्ही बाजूंनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अभिजीत सोनवणे, नाशिक

नाशिकच्या जयभवानीरोड परिसरामध्ये परप्रांतीय आणि मराठी वाद उफाळून आला आहे. गाडीला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद मराठी विरूद्ध परप्रांतीय असा झाल्यानंतर मनसैनिकांनी या परप्रांतीय इसमाला चोप देत धडा शिकवला. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसात दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाशिकच्या जय भवानी रोड परिसरामध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद विकोपाला गेल्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना घडली आहे. या परिसरामध्ये लासुरे नामक मराठी कुटुंब राहायला असून या कुटुंबाला या भागातील एका परप्रांतीय इसमाने गाडी शिकत असताना गाडीचा धक्का लागलेल्या वादावरून अपशब्द वापरल्याने हा वाद सुरू झाला. मराठी लोगो की औकात क्या? तुम मराठी लोक भंगार हो, अशी मुजोरी केल्याचा आरोप मराठी नागरिकांनी केला.

या कुटुंबाने परिसरातील मनसैनिकांना याबाबत माहिती दिल्यानंतर मनसैनिकांनी या परप्रांतीयाला मराठी माणसाला भिकारडा आणि भंगार का म्हणाला? असा जाब विचारला. यावेळी परप्रांतीयाने मनसैनिकांशी देखील अरेरावी केल्याने मनसैनिकांनी या परप्रांतीयाला चोप दिल्याने हा वाद चांगलाच चिघळला आहे.

या सगळ्या वादानंतर या परप्रांतीय कुटुंबीयांनी देखील आपली बाजू मांडली. केवळ गाडीचा धक्का लागला यावरून हा वाद झाला होता. आम्ही मराठी माणसाला कुठेही शिवीगाळ केली नाही किंवा अपशब्द वापरला नाही. हा गाडी लागल्यावरून झालेला व्यक्तिगत वाद आहे, अशा प्रकारचा खुलासा या कुटुंबीयांनी केला. आम्हाला हा वाद वाढवायचा नाही, आम्ही देखील याच भागात गेल्या अनेक वर्षांपासून राहत असून आम्ही येथील मतदार आणि नागरिक आहोत. त्यामुळे हा वाद मिटावा अशी आमची मागणी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान या सगळ्या वादाप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये लासुरे कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून या परप्रांतीय कुटुंबीयांकडून देखील पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मराठी विरुद्ध परप्रांतीय वादावर पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर पडदा पडतो की हा वाद अजून वाढतो? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tragedy : झाडांची पाने तोडणं पडलं महागात; विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू, २ मुले झाली पोरकी

Maharashtra Live News Update: आठ वर्षाच्या मुलींनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टाळला आणि आईचा जीव वाचला

युतीआधीच ठाकरेंमध्ये वादाची ठिणगी? काँग्रेसला सोबत घेण्याची राज यांची इच्छा

Nashik News: महिला रील स्टारची गुन्हेगारी भाषा, पोलिसांनी उतरवला माज

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार? आठवलेंच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'ने ठेवली एक अट

SCROLL FOR NEXT