Nashik News: महिला रील स्टारची गुन्हेगारी भाषा, पोलिसांनी उतरवला माज

Reel Star Teen Girls Warned For Gangster: आता रील्स स्टार गुन्हेगारीची भाषा करायला लागले आहेत... अशाच गुन्हेगारीची आणि ताणून मारण्याची भाषा करणाऱ्यांना नाशिक पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय.. मात्र नाशिकमध्ये नेमकं काय घडलं होतं? आणि गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या रील्स स्टार तरुणींची पोलिसांनी कशी झिंग उतरवलीय?
Nashik Devlali Police taking action against teen girls who glorified crime in viral reels
Nashik Devlali Police taking action against teen girls who glorified crime in viral reelsSaam Tv
Published On

हे नाशिक आहे भावा. इथं तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल, नाहीतर तुझी डेडबॉडी थेट सिव्हिलला भेटेल...... ही भाईगिरीची भाषा आहे नाशिकमधील तरुणींची... मात्र नाशिकच्या देवळाली पोलिसांनी गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या तरुणींना गुडघ्यावर आणत त्यांची झिंग उतरवलीय...

नाशिकच्या 2 तरुणींनी रामकुंड परिसरात गुन्हेगारीची भाषा करणारी रील्स शूट केली.. या रील्समध्ये तरुणींनी इज्जत दिली तर इज्जत भेटेल नाहीतर तुझी डेड बॉडी सिव्हिलला भेटेल, असं मग्रुर वक्तव्य केलं... हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण वेळीच ठेचण्यासाठी नाशिक पोलीस अॅक्टिव्ह झाले... देवळाली कॅम्प पोलिसांनी भाईगिरी करणाऱ्या तरुणींचा शोध घेत पोलिसी खाक्या दाखवला आणि अवघ्या 2 मिनिटात तरुणींची भाईगिरी गळून पडली.. आणि यापुढं गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणार नाही, असं म्हणत माफीनामा दिलाय...

खरंतर गुन्हेगारीचा, ड्रग्ज माफियांचा बालेकिल्ला बनत चाललेल्या नाशिक जिल्ह्याची साफसफाई करण्याची मोहीम नाशिक पोलिसांनी हाती घेतलीय.. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडलंय.. आता नाशिकमध्ये गुन्हेगार नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला घोषणा द्यायला लागलेत... खरंतर नाशिक पोलीस आयुक्तांना गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना फ्री हँड दिलाय

आता गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे रील्स स्टार तरुणींना पोलीसांनी धडा शिकवला.. त्यामुळे फक्त रील्स बनवून गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारेच नव्हे तर इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणलेत.. त्यामुळे नाशिक गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम आणखी तीव्र करायला हवी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com