युतीआधीच ठाकरेंमध्ये वादाची ठिणगी? काँग्रेसला सोबत घेण्याची राज यांची इच्छा

Sanjay Raut Sparks Political Tension: काँग्रेसला सोबत घेण्याबाबतच्या संजय राऊतांच्या वक्तव्याने राज ठाकरे नाराज झालेत... त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचं गणित जुळण्याआधीच तुटण्याची चर्चा रंगलीय.. मात्र राऊतांनी नेमकं काय वक्तव्य केलं आणि त्याचे कसे पडसाद उमटलेत...
Raj Thackeray and Sanjay Raut in a recent political event, highlighting tensions over Congress alliance talks ahead of Maharashtra elections.
Raj Thackeray and Sanjay Raut in a recent political event, highlighting tensions over Congress alliance talks ahead of Maharashtra elections.Saam Tv
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती जुळण्याआधीच वादाची ठिणगी पडलीय.. आणि त्याला कारण ठरलंय संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य....काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलं आणि त्यावरुन मनसेत नाराजीची लाट पसरलीय... मनसेबाबत भूमिका मांडण्याचा इतरांना अधिकार नाही म्हणत संदीप देशपांडेंनी राऊतांना टोला लगावलाय..

आता राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या हाती आयतंच कोलित मिळालंय.. राऊतांनी कट्टर हिंदूत्ववादी राज ठाकरेंच्या मनसेला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याची सुपारी घेतल्याचा टोला भाजपनं लगावलाय.. तर काँग्रेसची भूमिका काँग्रेसच ठरवेल असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलय

खरंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्यास नकार दिलाय..त्यानंतरही राऊतांनी वक्तव्य केलं.. त्यामुळे टीकेची झोड उठल्यानंतर अखेर संजय राऊतांनी राज ठाकरेंना फोन करुन आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगितलंय, अशी माहिती सुत्रांनी दिलीय..मात्र काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घेण्यास विरोध का करत आहे?

खरंतर राज ठाकरेंचं राजकारण हिंदूत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आधारित आहे.. त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतं काँग्रेसपासून दुरावण्याची भीती आहे.. तर यंदाच्या बिहार आणि पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही फटका बसण्याची शक्यता आहे... एवढंच नव्हे तर काँग्रेस मुंबईत एकला चलो नारा देण्याच्या विचारात आहे.. त्यामुळे आघाडी झाली तरी मनसेला सोबत घेतल्यास जागा वाटपात तडजोड करावी लागण्याची भीती आहे

खरंतर 3 महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या 6 भेटी झाल्या आहेत.. आता युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असताना राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतरही ठाकरे बंधूंची मनं युतीसाठी जुळणार की फाटणार? यावर मुंबई महापालिकेचं सत्तेचं समीकरण ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com