City Link Bus Service Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: नाशिककरांसाठी मोठी बातमी! सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Nashik City Link Bus Service: नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे शहरातील बस ठप्प झाली आहे.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे

City Link Bus Employees Strike Nashik

नाशिककरांसाठी मोठी बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा (Nashik City Link Bus) पुन्हा ठप्प झाली आहे. कारण दोनशेपेक्षा अधिक वाहक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. वाहक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिक शहरातील सिटी लिंक बससेवा बंद आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. (Latest Marathi News)

महानगरपालिकेची सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. त्यामुळे याअगोदर अनेकदा या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचं आपण पाहिलं आहे. आताही सलग दोन ते तीन महिन्यांचा पगार रखडला (Nashik News) आहे. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल

आज पहाटेपासूनच तपोवनमध्ये असलेल्या बस डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. आज एकही बस रस्त्यावर धावणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतला (City Link Bus Employees Strike) आहे. अचानक बस बंद झाल्यामुळे मात्र प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे नाशिककरांना प्रवास करताना अडचणींना सामना करावा लागत आहे.

दोन ते तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने आज (२९ फेब्रुवारी) अचानक संप पुकारत कर्मचाऱ्यांनी एकही बस डेपो बाहेर येऊ दिली नाही. त्यामुळे कामगार, विद्यार्थी, प्रवाशांचे हाल होत (City Link Bus Service) आहेत. शिवाय प्रत्येकाच्या खिशाला भुर्दंड देखील बसत आहे. या आंदोलनाचा फटका नाशिककरांसह सिटी लिंक बस व्यवस्थापनाला देखील बसणार आहे.

वाहक कर्मचारी आक्रमक

गेल्या दोन ते तीन महिन्याचा पगार थकल्याने सगळे वाहक कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उगारलं (Citylink workers on strike) आहे. अचानक काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केलं आहे. त्यामुळे पहाटेपासून नाशिक शहरातील बससेवा खंडित झाली आहे.

नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलन केली जात आहेत. आता त्यांनी पगार (Bus Employees Strike) नाही, तर काम देखील नाही, असा पवित्रा घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT