NASHIK BUS ACCIDENT: ONE DEAD, SEVERAL INJURED AS LUXURY BUS OVERTURNS ON YEOLA-NANDGAON ROAD Saam tv
महाराष्ट्र

Accident News : भीषण अपघात! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली, एकाचा जागीच मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

Nashik Nagpur Accident News : नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर मध्य प्रदेशातून प्रवासी घेऊन जाणारी लक्झरी बस पलटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या येवला-नांदगाव रस्त्यावर लक्झरी बस पलटून भीषण अपघात

  • अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी

  • नागपूरच्या सावनेर परिसरातही तीन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Nashik Bus Accident News Update : नाशिकच्या येवला - नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातून प्रवासी घेऊन जाणारी लक्झरी बस पलटल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला असून इतर प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. दरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे २० ते २५ प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तत्काळ नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बस पलटल्यामुळे येवला-नांदगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. प्राथमिक तपासात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूरमध्ये भीषण अपघात ( Nagpur Car Accident Update News )

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे राष्ट्रीय महामार्गावरील दहेगाव-रंगारी परिसरातही रात्री उशिरा कश्मिरा लॉनसमोर तीन चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात आय-२० कार चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार यूटर्न घेत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने तिला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की स्विफ्ट डिझायर समोरून येणाऱ्या आय-२० कारवर आदळली. त्यानंतर आय-२० कार चालकाचे नियंत्रण सुटून कार ३ वेळा पलटी झाली. अपघातानंतर धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salted Peanuts Benefits : हृदयापासून ते वजन कंट्रोल करण्यापर्यंत, मूठभर खारट शेंगदाणे ठरतात वरदान

Cabinet Expansion: मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख समोर, शिंदे खासदारांसह दिल्ली दौऱ्यावर; कुणाला मिळणार मंत्रिपद?

Maharashtra News Live Update: पुण्यात नारायपेठमध्ये अपघात

8th Pay Commission Recruitment : 8 व्या वेतन आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 1.80 लाखांपर्यंत मानधन, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Black Magic Allegation: भर कोर्टात महिलेकडून जादूटोणा, न्यायाधीशांच्या खुर्चीवर पांढरी मोहरी फेकली नंतर...; घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT