Nashik Bus Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Bus Accident: भीषण बस अपघाताच्या चौकशीचे आदेश; मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

Nashik Bus Accident News: अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: नाशिकमध्ये (Nashik) एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा होरपळून मत्यू झाला आहे. तसेच ३८ जण यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची (Accident) तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी प्राथमिकता द्यावी असे आदेश दिले आहेत. सोबतच त्यांनी मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जर उपचारासाठी अपघातग्रस्तांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले तर त्याचा खर्च देखील राज्य सरकार करणार आहे. (Nashik Accident News)

या अपघातातबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिक येथे झालेल्या भीषण बस अपघातात ११ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असून या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाईल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहेत अशी माहीती त्यांनी ट्विटद्वारे दिली. (Maharashtra News)

त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सहकारी आ. देवयानीताई फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत अशी माहीती फडणवीसांनी ट्विट करत दिली आहे.

अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर

दरम्यान या दुर्देवी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. अपघात झाल्यानंतर काही मिनिटांतच बस जळून खाक झाली आणि आत अडकलेले प्रवासी जिवंत होरपळून मृत्यूमुखी पडले. याचे थरारक व्हिडिओ आता समोर आले आहेत.

पाहा व्हिडिओ -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

Kalyan Tourism : कल्ला मस्ती ऑन द वे! वीकेंडला फिरा 'कल्याण'जवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स, प्लान करा Summer ट्रिप

राजकारणात बदलाचे संकेत! २८८ नव्हे तर असतील ३५० आमदार; ५४४ ऐवजी असणार ६५० खासदार,MP, MLAची संख्या वाढणार?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीच पथक दाखल

SCROLL FOR NEXT