Nashik Accident Saamtv
महाराष्ट्र

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव कारची दुचाकीला धडक; दोघांची प्रकृती गंभीर

Nashik Accident: नाशिक शहरातील गंजमाल परिसरात नवी कोरी थार गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

तबरेज शेख, नाशिक|ता. १९ एप्रिल २०२४

नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील गंजमाल परिसरात नवी कोरी थार गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक (Nashik) चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. भरधाव थार गाडीने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झालेत.

अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.ही धडक इतकी भीषण होती की अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. तर नवी कोरी थार गाडी अपघातानंतर थेट दुभाजकावर चढली.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणी भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT