Nashik Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Girl Death in School at Nashik : शाळेच्या वर्गातच चक्कर येऊन बेंचवरून पडून सहावीतील मुलीचा मृत्यू, VIDEO

Nashik Breaking News: नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत 6 वी मध्ये शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख| नाशिक, ता. २५ जून २०२४

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत 6 वी मध्ये शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी शाळेत गेल्यानंतर ती चक्कर येऊन खाली पडली, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीचा वर्गातच मृत्यू झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून दिव्या त्रिपाठी असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दिव्या नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. शाळेमध्ये अचानक चक्कर आल्याने ती बेंचवरून खाली पडली. यामध्येच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबतचे कारण अद्याप समोर आले नाही.

दरम्यान, या घटनेनंतर मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे. तसेच पोलिसही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, हसत्या खेळत्या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT