श्रद्धेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारा आणि भक्तांना गंडा घालणाऱ्या भोंदू खरातचं 'हवाला रॅकेट'चं कनेक्शनही उघड झालंय. भोंदू खरातची सलग 10 व्या दिवशी SIT चौकशी करण्यात आलीय. यासाठी खरातला एका गुप्त ठिकाणी नेण्यात आलं. त्यावेळी पैशांची अफरातफर, परकीय चलनांचा बेकायदेशीर वापर आणि बड्या धेंडांचं पाठबळ असं खरातचं हवाला साम्राज्य SIT च्या समोर आलयं.
SIT ला खरातच्या व्यवहारांच्या डायऱ्या, डिजिटल पुरावे आणि बँक व्यवहारांचे तपशील मिळालेत. खरातकडून परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाला रॅकेटचा वापर केला जात असल्याचं उघड झालयं. खरात भारतातून दुबईला आणि तिथून पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणात हवालाद्वारे व्यवहार करायचा...यासाठी त्याने खासगी एजंट्स आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर केलाय. विशेष म्हणजे हे काळे धंदे सुरु ठेवण्यासाठी खरात बड्या अधिकारी, नेत्यांची मदत घेत होता. याप्रकरणात परकीय चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन झाल्याचंही SIT तपासात समोर आलयं.
त्यामुळे खरातच्या कारनाम्यांची व्याप्ती नाशिक किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादीत राहिलेली नाही. खरातच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनमुळे याप्रकऱणात ED लवकरच खरातला ताब्यात घेऊ शकते. त्यामुळे परदेशात गेलेला हा पैसा नक्की कोणाचा होता? दुबईत या पैशांचा वापर कशासाठी झाला ? स्वत:चे खिसे गरम करण्यासाठी कोणते अधिकारी आणि नेते खरातला पाठबळ देत होते? या प्रश्नांची उत्तर समोर येणे महत्वाचे आहे. त्यामुळे खरातसारख्या नराधमाला राजश्रय देणाऱ्यांचा बुरखा आता टराटरा फाडायला हवा.. नाही तर ही वाळवी फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला पोखरल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.