Nashik Ashok Kharat Case Rupali Chakankar Saam Tv
महाराष्ट्र

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचं महिला अध्यक्षपद जाणार? खरात प्रकरणावर प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितले

Nashik Ashok Kharat Case Rupali Chakankar : नाशिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात जे लोक खरातसोबत आहेत त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई होणार असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये भोंदू ज्योतिष अशोक खरात अटकेत

  • रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो व्हायरल

  • चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी

  • प्रफुल पटेल यांची कडक कारवाईची मागणी

नाशिकमध्ये पोलिसांनी अशोक खरात या भोंदू ज्योतिषाला बलात्कार प्रकरणात अटक केली आहे. याप्रकरणी चौकशीत मोठे धागे दोरे समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचेही खरातसोबतचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी आरोपी अशोक खरात याच्यासोबत असलेल्या लोकांवर कारवाई होणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता रुपाली चाकणकरांच अध्यक्ष पद जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाशिकमधील अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याचा वर्षानुवर्षे सुरु असलेल्या भोंदूगिरीचा बुरखा पोलिसांनी बुधवारी फाडला. भविष्य सांगण्याच्या नावाखाली खरातने अनेक महिलांवर बलात्कार केला. याप्रकरणी नाशिक पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. धक्कादायक म्हणजे या भोंदू बाबाच्या जाळ्यात फक्त सर्वसामान्य महिलाच नाहीत तर अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटी देखील अडकल्याचे समोर आले आहे.

अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्यासोबत राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचे असलेले फोटो आणि व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर राज्यातील विविध नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करत चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत आहे.

यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, भोंदु बाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आणि घाणेरडा आहे. त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी आणि जे लोक त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे. त्याच प्रमाणे या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नाव देखील जोडले गेले आहेत, त्यावर आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून योग्य कार्यवाही करणार आहोत आणि ते येणाऱ्या काळात दिसेल.दरम्यान रुपाली चाकणकरांचं अध्यक्ष पद जाणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; शिर्डीनंतर शेगावात अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा, FDA च्या रडारवर राज्यातील देवस्थानं

Supreme Court : अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना मिळणार ६३ लाख आणि ७.५ टक्के व्याजाने भरपाई; सुप्रीम कोर्टाचा आदेश

मोठी बातमी! भाजपच्या वरिष्ठ महिला नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Pune : पुण्यात खळबळ! बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त, दररोज ४०० जणांची होत होती फसवणूक

Aadhaar Card Update: आधार कार्डबाबत ही एक चूक तर झाली नाहीना? अन्यथा सरकारी योजना बंद होणार

SCROLL FOR NEXT