Nashik Nagar Panchayat Election Results अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Nashik: 6 नगरपंचायत निवडणूक निकाल घोषित; पेठ नगरपंचायतीवरील सेनेच्या वर्चस्वाला धक्का, राष्ट्रवादीचं वर्चस्व

6 नगरपंचायती पैकी 2 भाजप, 2 राष्ट्रवादी, 1 शिवसेना आणि एक महाविकास आघाडीकडे

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत 6 नगरपंचायती पैकी 2 भाजप, 2 राष्ट्रवादी, 1 शिवसेना आणि एक महाविकास आघाडीकडे जागा आली आहे. सुरगाणा आणि देवळा नगरपंचायतीवर भाजपने (BJP) सत्ता मिळवली आहे. तर निफाडमध्ये 17 पैकी 7 जागा मिळवून शिवसेना (Shivsena) विजयी ठरला आहे. (Nashik Nagar Panchayat Election Results)

जिल्ह्यात एकूण सहा नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. कृषीमंत्री दादा भुसे, भाजपच्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसला आहे. दिंडोरी या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

तर, यावेळी निफाड नगरपंचायतीमध्ये सत्तांतर पाहायला मिळाले असून, भाजपला धक्का सहन करावा लागला आहे. निफाड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का बसला आहे. (Nagar Panchayat Elections 2022 Result)

6 नगरपंचायत घोषित निकाल (Nashik Nagar Panchayat Election Results Live)

1) सुरगाणा नगरपंचायत;

भाजपचं वर्चस्व, सेनेला धक्का

एकूण जागा - 17

शिवसेना - 06

भाजप - 08

माकप - 02

राष्ट्रवादी काँग्रेस - 01

---------------

2) देवळा नगरपंचायत;

भाजपचा एकहाती विजय

एकूण जागा - 17

भाजप - 15

राष्ट्रवादीला - 2

---------------

3) निफाड नगरपंचायत;

भाजपची सत्ता उलथवली, शिवसेनेचा भगवा फडकला

एकूण जागा - 17

शिवसेना- 07

राष्ट्रवादी काँग्रेस- 03

काँग्रेस - 01

शहर विकास आघाडी - 04

बसपा- 01

इतर(अपक्ष)-01

पहा व्हिडीओ-

4) कळवण नगरपंचायत;

राष्ट्रवादीचं वर्चस्व, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना धक्का

एकूण जागा - 17

राष्ट्रवादी - 09

भाजप - 02

काँग्रेस - 03

शिवसेना - 02

मनसे - 01

-------------

5) दिंडोरी नगरपंचायत;

शिवसेनेला सर्वाधिक जागा, महाविकास आघाडीकडे सत्ता

एकूण जागा - 17

राष्ट्रवादी - 05

शिवसेना - 06

काँग्रेस - 02

भाजपा - 04

---------------

6) पेठ नगरपंचायत;

सेनेचं वर्चस्व संपुष्टात, राष्ट्रवादीकडे सत्ता

एकूण जागा - 17

राष्ट्रवादी - 08

शिवसेना - 04

माकप - 03

भाजप - 01

अपक्ष - 01

(Maharashtra Nagar Panchayat Election Results Live Updates)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

SCROLL FOR NEXT