sharad pawar, narendra patil, chhatrapati shivaji maharaj saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar News : शरद पवार जाणता राजा ही छत्रपती शिवरायांशी तुलना अयाेग्य : नरेंद्र पाटील

ते म्हणाले तुलना करणाऱ्या व्यक्तीने ती व्यवस्थित केली पाहिजे.

ओंकार कदम

Sharad Pawar News : संपूर्ण विश्वात एकच जाणते राजे आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे एका प्रश्नावर उत्तर देताना अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. ते आज साता-यात (satara) आले हाेते. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना पाटील यांनी उत्तर देताना छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काेणाशीही हाेऊ शकत नाही असे नमूद केले.

माध्यम प्रतिनिधींनी नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादीचे (ncp) कार्यकर्ते शरद पवार (sharad pawar) यांना जाणता राजा म्हणतात असे म्हटले. त्यावर पाटील म्हणाले जाणता राजा तर संपूर्ण विश्वात एकच छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांची उंची आणि त्या व्यक्तीशी कधीच तुलना होऊ शकत नाही त्यांच्या काही कार्याची नक्की तुलना होऊ शकते परंतु छत्रपतींशी तुलना करणे हे अयोग्य आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्याची अशी तुलना करत असतो. त्यामुळे अशी तुलना केल्याने महाराजांचा अपमान झाला असे होत नाही असेही पाटील यांनी म्हटलं. ते म्हणाले तुलना करणाऱ्या व्यक्तीने ती व्यवस्थित केली पाहिजे योग्य त्या गोष्टी समजून बोललं पाहिजे असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT