Modi 3.0 Government Saam Tv
महाराष्ट्र

Modi 3.0 Government: राज्यातील ‘या’ नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी? शिंदे गटाला किती मंत्रिपदं? रामदास आठवलेंचं काय होणार?

India PM Oath Ceremony: नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असणार ? महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याची उत्सुकता आहे. महायुतीतील काही खासदारांची नावे चर्चेत आहे. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्री असा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय.

साम टिव्ही ब्युरो

गिरीश निकम, साम टीव्ही, प्रतिनिधी

नरेंद्र मोदी 9 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत. रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

यावेळी मोदींसोबत 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील. मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्यालाही काही मंत्रीपदं येणार आहेत. यात शिंदे गट आघाडीवर आहे.

भाजपकडून हे मंत्री घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ

  • नितीन गडकरी

  • पीयूष गोयल

  • उदयनराजे भोसले

  • हेमंत सावरा

  • रक्षा खडसे

शिवसेना (शिंदे गट)

राष्ट्रवादी (अजित पवार गट)

  • प्रफुल्ल पटेल

शिंदे गटाला दोन मंत्रीपदं दिली जाण्याची शक्यता आहे. यातलं एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रीपद असेल. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्यावं, अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्रआदित्य ठाकरेंना मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरेंवर जी टीका झाली, तीच टीका आपल्यावरही होऊ शकते याची भीती असल्यानं एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळणार का?

दरम्यान, रामदास आठवले यांच्या पक्षाने महायुतीत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. एकही सीट न घेता आठवले यांनी देशभर भाजपचा प्रचार केला होता. त्यामुळे आठवलेंनाही मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं बोललं जातंय. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी आठवलेंना कॅबिनेटपदी बढती देण्याबाबतचं आश्वासन निवडणुकीत दिलं होतं. चार महिन्यावर विधानसभा निवडणुका असल्यानं आठवलेंना ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

एनडीएत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे जास्त जागा असल्यानं या दोन पक्षांना सर्वाधिक मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे.. मोदींच्या तिस-या टर्मच्या मंत्रिमंडळाचा चेहरा हा मागच्या दोन मंत्रिमंडळापेक्षा वेगळा असेल हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

Gold Rate Today: दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ८,७०० रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; बड्या नेत्याच्या निधनाने राजकारणात हळहळ

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

Heart Blockage: लिंबू-आल्याचं पाणी प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय कसे ठीक कराल ब्लॉकेज?

SCROLL FOR NEXT